का कळेना Ka Kalena Lyrics in Marathi | Mumbai Pune Mumbai

"का कळेना" हे गाणे मुंबई पुणे मुंबई (२०१०) चित्रपटातील आहे. का कळेना हे गाणे बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर यांनी गायले आहे. का कळेना कोणत्या क्षणी - हे गाणे अविनाश-विश्वजीत (अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी) या जोडीने संगीतबद्ध केले आहे. अविनाश-विश्वजीत ही अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी यांची मराठी चित्रपट संगीतकार जोडी आहे. अविनाश-विश्वजीत हे त्यांचे व्यावसायिक नाव आहे.

का कळेना या गाण्याचे बोल सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहेत. मुंबई पुणे मुंबई (२०१०) मूव्ही स्टार कास्ट : स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे.


का कळेना गाण्याचे बोल


का कळेना कोणत्या क्षणी

हरवते मन कसे ♪♪♪

उमलती कशा धुंद भावना

अल्लड वाटे कसे ♪♪♪

बंध जुळती ♪♪ हे प्रीतीचे ♪♪♪

गोड नाते हे ♪♪♪

जन्मांतरीचे! ♪♪♪♪


एक मी एक तू ♪

शब्द मी गीत तू ♪

आकाश तू आभास तू ♪

सार्यात तू ♪♪♪♪

ध्यास मी श्वास तू ♪

स्पर्श मी मोहोर तू ♪

स्वप्नात तू सत्यात तू ♪

सार्यात तू ♪♪♪


पंख लाउनी उडत चालले

मन हे तुझ्यासवे ♪♪

तुझा मी माझी तू

कधी केंव्हा कसे

जुळले बंध हे ♪

अबोल प्रित ही ♪♪

हे नाते नवे ♪♪

अजब रित ही

हे स्वप्न नवे ♪♪♪


♪♪♪

या भोवतली काही दिसेना

तू आणि मी, मी आणि तू

बाकी उरेना ♪♪♪

होतो कुठे अन आलोत कुठे

रस्ता कुठे जाई कसा

काही कळेना ♪♪♪


घडले कसे कधी ♪

कळले न जे कधी ♪

हळुवार ते आले कसे

ओठावरी ♪♪♪

दे ना तू साथ दे ♪♪

हातात हात दे ♪♪

नजरेतला नजरेतुनी

इकरार घे ♪♪♪


का कळेना कोणत्या क्षणी

हरवते मन कसे ♪♪♪

उमलती कशा धुंद भावना

अल्लड वाटे कसे ♪♪♪

बंध जुळती ♪♪ हे प्रीतीचे ♪♪♪

गोड नाते हे ♪♪♪

जन्मांतरीचे! ♪♪♪♪


🎧 गीत क्रेडिट:


♪ गाणे : का कळेना

♪ गीतकार : सतीश राजवाडे, श्रीरंग गोडबोले

♪ गायक : बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर

♪ चित्रपट : मुंबई पुणे मुंबई

♪ कलाकार : स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे

♪ संगीत : अविनाश-विश्वजीत

♪ लेबल : एवरेस्ट मराठी


♪ का कळेना गाण्याचे बोल मराठी

♪ Ka Kalena Konatya kshani Lyrics in Marathi